मौजे अकोले खुर्द तालुका माढा येथील श्री गणपती एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालित, श्री गणपती फार्मसी महाविद्यालयांमधील प्रा. मुक्ताई जाधव या सण 2021 या वर्षासाठी घेण्यात आलेल्या जी-पॅट (ग्रॅज्युट फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट) या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या त्यांच्या या उज्वल यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांनी एन. टी. ए अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील अतिशय अवघड जी-पॅट परीक्षेमध्ये यश मिळवल्यामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी प्रा. मुक्ताई जाधव म्हणाल्या की आई- वडील , प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे , व उच्चशिक्षित प्राध्यापकाच्या सहकार्यामुळे हे यश संपादन झाले .त्यांच्या उज्ज्वल यशामुळे महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणा मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरणार आहे. त्या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.आर.डी बेंदगुडे अध्यक्ष अॅड.विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्रा. प्रशांत मिसाळ, प्रा.महादेवी भोसले व प्रा. रोहिणी गुटाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले.