26.8 C
Solapur
February 29, 2024
उस्मानाबाद 

छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी.- खा. ओमराजे निंबाळकर.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – हॉटेल, पान टपरी, छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मा. जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली.

जिल्ह्यात दि. 28/03/2021 च्या नवीन परिपत्रकानुसार कोविड-19 प्रतिबंध करण्यासाठी हॉटेल व्यवसायिक, पान टपरी छोट्या व्यवसायासाठी बंदी घालण्यात आली आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्यांना या जाचक अटीतुन बाहेर काढून त्यांना इतर व्यापाऱ्यांन प्रमाणे सदर परिपत्रकामध्ये अंशत: बदल करुन शासनाच्या कोविड-19 प्रतिबंधाच्या सुचना पाळून व नियमांच्या अधिन राहून खाजगी कोचिंग क्लासेस, खानावळ व हॉटेल्स 50% उपस्थितीत सुरु करण्याची तसेच ठराविक वेळेत व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी.

हॉटेल, पान टपरी, छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे.

Related posts