तुळजापूर / प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गणामधील शिवसैनिक व कार्यकर्त्यांचा उत्साह दिवसेंदिवस वाढतच चालला असून ही निवडणूक एकतर्फी होताना दिसत आहे.
काल पिंपळा खुर्द येथे घर ते घर प्रत्यक्ष गाठी-भेटी घेत सौ. संगिता जगन्नाथ गवळी यांचा प्रचार मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रचारात शेकडो लहान, थोर, ज्येष्ठ तसेच युवक वर्ग समाविष्ट झालेला दिसून आला. जमा झालेल्या या भव्य गर्दीमध्ये जनतेचा सरकार वरील रोष, तालुकाप्रमुखांनावरील असलेलं प्रेम व त्यांच्यावर असलेला दृढ विश्वास सरळ सरळ दिसून आला. प्रथमता शंभुमहादेव मंदिरात पूजा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वांनी दर्शन घेतले. त्यानंतर संपूर्ण गावामध्ये घर ते घर सर्वांच्या भेटी घेऊन मतरूपी आशीर्वाद देण्यासाठी सर्वांना विनंती उपस्थिती जनसमुदाय मार्फत करण्यात आली.
यावेळी तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी बोलताना आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत आत्तापर्यंत मी तालुक्यामध्ये शेकडो सभागृह, अगणित विदयुत डीपी, शेतकऱ्यांसाठी अगणित आंदोलने, निवेदने तसेच उपोषण, कित्येक वेळा जनतेच्या प्रश्नांसाठी प्रशासनाबरोबर दोन हात, जनतेच्या वैद्यकीय अडचणी अशा विविध कारणांमध्ये मी सदैव जनतेसाठी कार्य करून माझा परिचय करून दिलेला चं आहे, परंतु तुम्ही एकदा तुळजापूर ला पाठवून बघा, एक पंचायत समिती सदस्यांचे कार्य काय असते हे जगाला दाखवून देऊ असे जाहिर आवाहन यावेळी तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी उपस्थित मतदार बांधवांना केले.
तालुकाप्रमुखांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित ग्रामस्थानी भरगोस मताधिक्य देण्याचे आश्वासन यावेळी तालुकाप्रमुखांना दिले. उपस्थित लोकांच्या प्रतिक्रिया पाहता या निवडणुकीतील विजयश्री स्पष्ट होताना दिसून येत आहे.
