सांगोला

सांगोला साखर कारखान्याचा २००० रू. प्रती टनाने पहिला हफ्ता जमा – चेअरमन अभिजीत पाटील

( १५दिवसांत शेतकऱ्यांचे ऊस बील व तोडणी वाहतूकदारांचे बील खात्यावर जमा)

प्रतिनिधी/-

सांगोला तालुक्यातील वाके-शिवणे येथील सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी चालविण्यास घेतला असून बारा वर्षांपासून बंद असलेला साखर कारखाना धाराशिव साखर कारखान्याने अवघ्या एक महिन्यात गाळप ही सुरू झाले आणि शेतकऱ्यांचा ऊस गाळप करून १५दिवसात शेतकऱ्यांचे ऊस बील व तोडणी वाहतूकदाराचे बील देण्यात आले आहे.

मागच्या काही दिवसांपुर्वी देशाचे नेते शरद पवार यांनी चेअरमन अभिजीत पाटील यांचे विशेष कौतुक केले होते. बारा वर्ष बंद असलेला साखर कारखाना सुरू झाल्याने पवारसाहेब ही चक्क झाले. व पवारांनी तोंड भरून अभिजीत पाटील यांचे अभिनंदन केले.

शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ दिवसाला ऊसाचे व तोडणी वाहतूक दाराचे बील जमा केले आहे. तसेच बैलपोळा व दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांचा सण गोड व्हावा म्हणून दोन हाफ्ते देण्यात येतील. विठ्ठल परिवारांतील शेतकरी सभासद, कार्यकर्त्यांनी कोणीही हवालदिल न होता हा कारखाना विठ्ठल परिवारांचा आहे त्यामुळे सर्व परिवारांतील शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आणल्याशिवाय सांगोला कारखाना बंद करणार नाही असे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आल्यापासून अवघ्या १५ दिवसात ऊस बील दिल्याने शेतकऱ्यांतून चेअरमन अभिजीत पाटील यांचे कौतुक होत आहे.

Related posts