सचिन झाडे
पंढरपूर –
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2020-21 मध्ये उत्पादीत झालेल्या पहिल्या पाच साखर पोत्यांचे पूजन साखर हमाल कॉन्ट्रॅक्टर नागाप्पा शिऊर, परमान्ना शिऊर यांचे हस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळेसाहेब, संचालक बाळासाहेब कौलगे,भारत कोळेकर,दिनकर चव्हाण,नागेश फाटे, योगेश ताड, इब्राहिम मुजावर माजी संचालक शहाजी पासले,ईस्माईल मुलाणी,तुकाराम माने,राजसिंह माने,दिपक गवळी,कारखान्याचे आधिकारी कर्मचारी उपस्थित होते.