जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
उस्मानाबाद – .
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजय विठ्ठलराव तायडे यांनी परंडा, भुम, तुळजापूर, उस्मानाबाद आदी आधी ठिकाणी बैठकांचे आयोजन करत प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे.
विद्यमान आमदारांच्या मंडळाच्या 200 संस्था असतील तर आपल्याकडे इंग्रजी संस्थाचालकांच्या तीन हजार संस्था असल्याने आपला विजय निश्चित होणार असा विश्वास संजय तायडे पाटील यांनी या बैठकांमध्ये व्यक्त केला.
अखिल भारतीय क्रांती सेनेचे पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील यांनी हा सर्वसामान्यांचा प्रतिनिधी आहे त्यामुळे धनशक्ती वर जनशक्ती विजयी झाली पाहिजे असे आवाहन उपस्थितांना केले.
यावेळी शिवक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजय सावंत, क्रांती सेनेचे उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख अमोल आण्णाशेळके, सरचिटणीस शेख मुनीर, साहित्यिक डी.के.शेख, मेस्टा संघटनेचे सचिन पाटील, डॉ. रामेश्वर यादव आदींचा सहभाग होता. बळीराजा पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजू देवकर, युवक अध्यक्ष तात्या रोडे यांनी संजय तायडे जाहीर पाठिंबा दिला. प्रचार दौरा यशस्वी करण्यासाठी श्रीपाद मसलेकर, जबिन सिद्दीकी मॅडम, अमर मगर, ज्ञानेश्वर बोबडे, लक्ष्मण सरडे क्रंतीसेनेचे किरण म्हेत्रे आदींनी विशेष परिश्रम घेतले.