पंढरपूर प्रतिनिधी /गणेश महामुनी
समृद्धी ट्रॅक्टर इथे ग्राहक लकी ड्रॉचे बक्षीस वितरण केले. नेहमी शेतकऱ्यांच्या हित जोपासणारी ही संस्था विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते. यावेळी विजेते म्हणून श्री.बब्रुवान झिंजुर्टे आढीव (दोन चाकी गाडी) तर कामतीचे श्री.श्रीनिवास भोसले (३ग्राॅम), व श्री.विकास काटवटे (२ग्राॅम) सोने नाणे देऊन ग्राहक लकी ड्रॉचे बक्षीस वितरण करण्यात आले.
पंढरपूर तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असून शेतकरी हा समृद्धीमय व्हावा या भावनेतून हि संकल्पना केली. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात समृद्धी ट्रॅक्टर नेहमी कार्यरत असते असे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील म्हणाले.
यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. अमर पाटील साहेब, संचालक श्री.अभिजीत कदम, मॅनेजर श्री.सोमनाथ केसकर, सोनालिका कंपनीचे श्री.कुलदीप सिंग, श्री.सुबोध कुमार, श्री.साहिल शिंगला सर, श्री.सुरेंद्र ठाकूर सर आदी शेतकरी ग्राहक उपस्थित होते.