भूसंपादन शेतकऱ्यांचे मोबदला देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु.
सचिन झाडे –
पंढरपूर –
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथून नँशनल हायवे क्र.९६५ संदर्भातील भूसंपादन शेतकऱ्यांचे मोबदला देण्याचे काम भू संपादन अधिकारी सचिन ढोले यांच्या अधिकारा खाली युद्ध पातळीवर सुरू आहे.पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी शेतकर्यांच्या शेती जागेची पाहणी करत जमिनीवर बसून जागेवरच शेतकर्यांचे प्रश्न सोडवत असल्याने शेतकर्यामधून समाधान व्यक्त होत आहे.
परंतु तालुक्यातील कौठाळी गावातील काही शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याने त्यांना मोबदला मिळाला नव्हता,पण प्रांताधिकारी यांनी कौठाळी येथील त्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष त्यांच्यासोबत खाली बसून त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा प्रश्न निकाली काढल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान होत आहे.
प्रांताधिकारी सचिन ढोले यांची ही कामगिरी म्हणजे अधिकार्यांसाठी एक आदर्श ठरली आहे. कोरोना,महापूर, ओला आणि कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी,विविध संघटनांची आंदोलने,गावभेट दौरे प्रशासकीय कामे ,विविध मंत्र्यांचे दौरे अशा अनेक कामामध्ये ते यशस्वी ठरले आहेत. ते लोकप्रिय अधिकारी म्हणून त्यांची चर्चा आता जनतेतून होत आहे. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार मिळाला आहे.