उस्मानाबाद 

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन ; जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करण्याचे आवाहन.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

उस्मानाबाद – शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या वतीने आणि सह्याद्री ब्लड बँक ,तसेच भा.ज.यु. मो. उस्मानाबाद यांच्या सहकार्याने प्रतिष्ठान भवन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, उस्मानाबाद येथे रक्तदान शिबिराचे आयोजन दि.२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आले आहे.

सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासू लागलेला आहे, याच पार्श्वभूमीवर हे भव्य राज्यस्तरीय रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी या शिबीरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान टीम उस्मानाबाद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिबीरा मध्ये सहभागी होणाऱ्या रक्तदात्यास पुस्तक आणि प्रमाणपत्र देण्याचे टीम उस्मानाबाद यांच्या वतीने ठरले आहे

Related posts