hacklink hack forum hacklink film izle hacklink jojobetgrandpashabethepbet giriscasibomjojobetcasibom
महाराष्ट्र

नवाब मलीक यांना न्यायालयने जामीन नाकारला, 7 मार्चपर्यंत ईडी कस्टडी

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money Laundering) अटकेत असलेल्या नवाब मलिक यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने मालिकांच्या ईडी कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ केली आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे मलिक यांची चौकशी अपूर्ण राहिली होती, असं सांगत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मालिकांची कोठडी वाढवावी अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालायने मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांच्या कोठडीत वाढ केली.

ईडीने मागितली सहा दिवसांची कस्टडी  

मुंबई सत्र न्यायायातील विशेष पीएमएलए न्यायलायाने पाच दिवसांची कोठडी नवाब मलिक यांना वाढून दिली आहे. तपास यंत्रणेने सहा दिवसांची कस्टडी मागितली होती. मात्र न्यायालयाने त्यांना 7 मार्चपर्यंतची कस्टडी दिली आहे. पहिल्यांदा न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली होती, त्यात 25 ते 28 फेब्रुवारी असे तीन दिवस नवाब मलिक प्रकृती अस्वस्थ्याच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे या तीन दिवसात चौकशी होऊ शकली नाही. त्याच बरोबर तपासातून जी नवीन माहिती पुढे आली आहे, त्यात काही साक्षीदारांनी सांगितलं की, नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक संबंध होते, असा युक्तिवाद करत ईडीने न्यायालयात मलिक यांच्या कोठडीत वाढ करण्यात मागणी केली होती. या युक्तिवादानंतर चौकशीचे जे तीन दिवस वाया गेले होते, त्यासाठी नवाब मलिक यांच्या कोठडीत न्यायालयाने पाच दिवसांची वाढ केली.

Related posts