21.9 C
Solapur
February 22, 2024
उस्मानाबाद  तुळजापूर

नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रास खा. ओमराजे निंबाळकर यांची भेट.

तपासणीस येणाऱ्या रुग्णाची माहिती घेत, त्यांची विचारपूस करत रुग्णांना दिला धीर.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर – नळदुर्ग ता.तुळजापूर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रास धाराशिव लोकसभेचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भेट देऊन तपासणीस येणाऱ्या रुग्णांची संख्या, सोयी-सुविधा औषधोपचार याची पहाणी केली. रुग्णालयात आलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करत खा. ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना धीर दिला.

प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात यावे. या कोरोना महामारीच्या काळात सर्व डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, नर्स तसेच अन्य सर्वांनीच आपला पूर्ण अनुभव पणाला लावून या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे.

पुन्हा एकदा “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही मोहिम प्रत्येक गावात, नगरपालिका क्षेत्रात सूरु करण्यात यावी. घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेण्यात यावी, यामुळे पहिल्याच स्टेज मध्ये रुग्णांवर उपचार करता येतील. कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या अधिकाधिक तपासण्या कराव्यात. Positive रुग्णांना तात्काळ तुळजापूर येथिल कोविड सेंटर वर पाठवण्यात यावे. तसेच कोरोना रुग्णांना उपचारासाठी अत्यावश्यक असलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी दररोजच्या दररोज पाठवण्यात यावी. जिल्हा स्थरावरून रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येईल.

तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी खा. ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी केले.

यावेळी युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख श्री. ज्ञानेश्वर घोडके यांच्यासह अनेक स्थानिक शिवसेना पदाधिकारी, नायब तहसीलदार श्री. भारती, गटविकास अधिकारी प्रतापसिंह मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुहास पवार आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related posts