भारत

न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांनी देशाचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

देशाचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांनी शनिवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्या. रमणा यांना शपथ दिली.
या कार्यक्रमास उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आदी उपस्थित होते. न्यायमूर्ती रमणा यांनी इंग्रजीतून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
सरन्यायाधीश शरद बोबडे हे २३ एप्रिलला सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली होती. त्यानंतर केंद्राने याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठविला होता. त्यानंतर देशाचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नियुक्ती केली.
७ ऑगस्ट १९५७ रोजी जन्मलेल्या न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांना सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणून २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत कार्यकाळ मिळणार आहे.

Related posts