लातूर :-
एनसीआरपीच्या रिपोर्टनुसार अदिवाशी महिलांवरील अत्याचाराच्या घटनात 26.5 टक्यांनी वाढ झाली आहे. ही बाब गंभीर आहे. पाक्सो केसेसेसह बलात्कार, सामूहिक बलात्कार, विनयभंग या केसेसमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. कोविड क्वारंटाईन सेंटरमधील दाखल महिलांवरती अत्याचार होत असताना सातत्याने मागणी करूनही बार, रेस्टॉरंट, स्विमींग पूल, चित्रपटगृहाला यांच्या एसओपी सरकारने जाहीर केल्या.
मात्र महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या कोविड क्वारंटाईनच्या एसओपी सरकारने जाहीर केल्या नाहीत.दिशा कायदा आजही अस्तित्वात आलेला नाही. . महिला सूरक्षिततेविषयी सरकार किती संवेदनशील आहे हे लक्षात येईल असा हल्लोबोल चित्रा वाघ यांनी लातूरातील पत्रकार परिषदेत केला. बलात्कार, विनयभंगाच्या घटना घडत असताना काही ठिकाणी पोलीस गांभीर्याने घेत नाहीत. अशा वर्दीला काळीमा फासणार्या पोलीस अधिकार्यांना बडतर्फ करावे अशी मागणीही चित्रा वाघ यांनी लातूरमध्ये केली.