hacklink hack forum hacklink film izle hacklink chicken roadrocket playrocket playlunchtime resultsDENEME BONUSUjojobetholiganbetjojobetsüperbetinsüperbetin girişsüperbetinsüperbetin girişsüperbetinsüperbetin girişbetcio
महाराष्ट्र

आयुर्वेद शिक्षण मंडळाचे संस्थापक वैद्य हरिभाऊ परांजपे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

पुणे,  : आयुर्वेद शिक्षण मंडळाचे संस्थापक वैद्य हरिभाऊ परांजपे यांच्या 38 व्या स्मृतीदिनानिमित्त 18 ते 20 नोव्हेंबर 2021 दरम्यान अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, सदाशिव पेठ, पुणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि वनौषधी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरामध्ये नेत्रतपासणी शस्त्रकर्म सल्ला, मधूमेही नेत्रविकार जनजागृती, रुग्णांना मोफत चष्मे वाटप, कान, नाक व घसा तपासणी, स्त्री विशिष्ट आजार, गर्भसंस्कार समुपदेशन विशेष चिकित्सा, आमवात, संधिवात, डेंग्यु चिकित्सा, मुळव्याध, भगंदर, मुतखडा तपासणी व उपयुक्त चिकित्सा, प्रकृती परिक्षण, रोगनिदान विभागांतर्गत हिमोग्लोबीन तपासणी, आहार सल्ला, योग मार्गदर्शन, सुवर्णप्राशन संस्कार शिबीर, अत्यल्प दरात कोविड प्रतिबंधक औषधे वाटप, औषधी वनस्पती प्रदर्शन, देहदान व अवयवदान नोंदणी अभियान व जागृती करण्यात येणार आहे.
हे शिबीर व वनौषधी प्रदर्शन सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत असून अधिक माहितीसाठी 9022564114 किंवा 9371002478 या क्रमांकावर संपर्क साधावा. शिबीरादरम्यान आयोजित सर्व उपक्रमास अध्यापक, महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचारी आणि सर्व आवासी वैद्य तसेच आंतरवासी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन आयुर्वेद शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनिल बहिरट यांनी केले आहे.

Related posts