प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
जिल्हा प्रशासनाकडून निवड करण्यात आलेल्या नगर पालिका पात्र अनुकंपधारक कर्मचाऱ्यांना डावलून नगर पालिका तुळजापूर चे मुख्याधिकारी यांनी भ्रष्टाचार केला असून संबधित बाब लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी या प्रकरणाच्या चौकशी साठी येणाऱ्या 28 जानेवारी रोजी तुळजापूर येथे मोर्चाचे आयोजन केले आहे सदर मोर्चा मुळे मुख्याधिकारी यांनी केलेला भ्रष्टाचार उघडकीस येईल या भितीने पोलीस यंत्रणेवर दबावतंत्र वापरून सोमनाथ कांबळे यांच्या वर खोटा गुन्हा नोंद करण्यासाठी शर्तीचे खोटारडे प्रयत्न मुख्याधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून चालू आहेत..
अशा मुजोर कर्मचार्यांवर पदाचा गैरवापर करने, दलित समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यां बदल खोटी बदनामी कारक माहिती पसरवुन दोन समाजात तेड निर्माण करने या कारनासाठी नगर पालिका तुळजापूरचे मुख्याधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यावर अनुसूचित जाती जमाती अॅक्ट नुसार गुन्हा नोंद करावा व पात्र अनुकंपाधारक यांना नौकरीत सामावून घ्यावे.
सोमनाथभाऊ कांबळे हे महाराष्ट्रातील मातंग समाजाचे नेते आहेत त्यांच्यावर जर खोटा गुन्हा नोंद झाला तर उस्मानाबाद जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रभर जेल भरो आंदोलनचा इशारा लहुजी शक्ती सेनेचे पांडुरंग तात्या कदम,प्रसिद्धी प्रमुख विकास गायकवाड सचिव बालाजी उपरे मोहन आप्पा कसबे दिपक कसबे बापु कसबे यांनी आमच्या प्रतिनिधीला बोलताना दिला आहे.