सोलापूर – अंबिका विद्या मंदिर,शिरापूर,तालुका-मोहोळ चे कृतीशील,उपक्रमशील प्राचार्य बी.जी.कुलकर्णी यांचा आॅनलाईन शिक्षण सोलापूर जिल्हा समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.”आॅनलाईन शिक्षण जिल्हा समन्वयकपदी प्रा.बी.जी.कुलकर्णी यांची जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी केलेली निवड अगदी योग्य असून या पदाला ते निश्चितच योग्य न्याय देतील”,असे गौरवोद्गार समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी काढले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर,उपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे,राज्य सरचिटणीस बोधिप्रकाश गायकवाड,जिल्हा सेक्रेटरी रवी देवकर,दिव्यांग विभाग प्रमुख विजयकुमार लोंढे,शहर संघटक प्रा.डॉ.राजदत्त रासोलगीकर,उत्तर तालुका अध्यक्ष संग्राम कांबळे,प्राथमिक विभाग जिल्हा प्रतिनिधी महेश क्षिरसागर,रामदास जाधव,कनिष्ठ महाविद्यालय प्रतिनिधी प्रा.अभिजीत भंडारे, चंद्रमनी वाघमारे,मंगळवेढा तालुका उपाध्यक्ष एकमल्ली,आश्रम शाळा प्रतिनिधी विठ्ठल नामदे,युवराज भोसले, नीलकंठ शिंगे,दाऊत आतार,प्रफुल्ल जानराव,प्रकाश साळवे,प्रेमचंद सावन्त, वीरभद्र स्वामी, शामराव वाघमारे, राजाभाऊ आढेगावकर, विनोद फडके,शिवाजी जगताप, किशोरभाऊ बनसोडे, संदीप निस्ताने, प्रा पी एस शिंदे, रमेश लोखंडे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.