22.1 C
Solapur
November 10, 2024
दक्षिण सोलापूर

भाकरी विकून दिवटे कुटुंबियांची यशाला गवसणी. कष्टाच्या भाकरीमुळेच साकारला १५ लाखांचा सुंदर बंगला.

अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी ब्रीज येथील दिवटे कुटुंबियांनी केवळ ज्वारीची भाकरी विक्री करुन यशाला गवसणी घालत फक्त दोनच वर्षात भाकरीच्या जीवावर १५ लाखांचा सुंदर बंगला साकारण्यात यशस्वी ठरलेले आहेत यामुळे दिवटे परिवाराचा एक यशस्वी उद्योजक म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दोन वर्षापूर्वी उमेश दिवटे हे टाकळी ब्रीज गावात आपले आईवडील.पत्नी,दोन मुली.एक मुलासमवेत कसेबसे मिळेल ते काम करत उदरनिर्वाह करत होते.
१५आगस्ट २०१९ चा दिवस.सकाळी दुपारी १२ची वेळ.एक तरुण मुलगा इकडे कुठे ज्वारीची भाकरी विकत मिळते का असे म्हणत दिवटे यांच्या घरासमोर आला.उमेश दिवटे यांनी ज्वारीची भाकरीच्या शोधात आलेल्या तरुणाला दोन तासात १०० नग ज्वारीच्या पातळ आणि कडक भाकरी बनवून दिल्या तेव्हापासून ज्वारीची भाकरी विक्री व्यवसायाचा श्रीगणेशा केल्याची माहिती उमेश दिवटे यांनी दिली.
आई शांताबाई.पत्नी जयश्री.मुलगी सृष्टी आणि शेवंती यांनी मिळून दररोज २ हजार ज्वारीच्या भाकरी बनवतात,आपल्या पातळ आणि कडक भाकरीला सोलापूर.विजापूर.शहर जिल्हा परिसरात हॉटेल.ढाबा.आणि इतर घरगुती समारंभात मोठी मागणी आहे,
दोन वर्षापूर्वी चालू केलेल्या ज्वारीची भाकरी विक्री व्यवसायातूनच घर बांधण्यासाठी जागा विकत घेऊन त्या जागेवर आज
१५ लाखांचा सुंदर बंगला साकारण्यात यशस्वी झाल्याचा आनंद दिवटे कुटुंबियांनी व्यक्त केला.
दिवटे परिवाराला दोन वर्षापूर्वी राहण्यासाठी जागासुध्दा नव्हती भाड्याने छोट्याशा घरात राहत होते. आज कष्टाच्या ज्वारीची भाकरी विक्री व्यवसायातून दिवटे कुटुबीय यशाला गवसणी घालत आहे. उमेश दिवटे यांची एक मुलगी कन्नड शाळेत आठवी वर्गात शिकते.तर दुसरी मुलगी पाचवीत आहे .दोन्ही मुली सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे शाळेत जात नाहीत, पण घरी आपल्या आईला ज्वारीची भाकरी बनविण्यासाठी मदत करतात. आठवीत शिकत असलेली सृष्टी दररोज स्वतः एक हजार भाकरी चुलीवर कडक बनविण्यासाठी धडपडत असते.सृष्टी शाळेतसुध्दा हुशार आहे तिच्या सद्गुणाचे कौतुक गावभर होत आहे,
एकंदर टाकळी ब्रीज येथील दिवटे कुटुंबिय भाकरी विक्री व्यवसायातून यशाला गवसणी घातली असून भाकरी विक्रीमुळेच केवळ दोन वर्षात १५ लाखांचा बंगला साकारण्यात यशस्वी ठरले आहेत यामुळे एक यशस्वी उद्योजक म्हणून दिवटे परिवारांची सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे .

Related posts