करमाळा

रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी व्हिटामिन सी, कॅल्शियम आणि व्हिटामिन डि3, यांचे ग्रामस्थांना वाटपाचा कार्यक्रम

करमाळा प्रतिनिधी उमेश पवळ

ग्रामपंचायत केम मध्ये ग्रामपंचायत केम आणी आरोग्य विभाग यांच्या वतीने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी व्हिटामिन सी, कॅल्शियम आणि व्हिटामिन डि3, यांचे ग्रामस्थांना वाटपाचा कार्यक्रम जिल्हापरीषद अध्यक्ष मा अनिरुद्ध कांबळे साहेब, किंगमेकर नेते मा अजितदादा तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच आकाश भोसले साहेब उपसरपंच नागनाथ तळेकर ,सदस्य, ग्रामस्त, आरोग्य विभाग कर्मचारी उपस्थित होते. कोरोना सर्वेक्षणात आरोग्य कर्मचारी (आशा कर्मचारी) मार्फत या औषधाचे वाटप घरोघरी करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रा आ केंद्र केम येथे वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष पालखे यांनी दिली .

या वेळी प्रत्येक आशा कर्मचारी यांना अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली, उपसरपंच नागनाथ तळेकर सर यांच्या कडून प्रोत्साहनपर 2000 रु मा अनिरुद्ध कांबळे अध्यक्ष जिल्हापरीषद सोलापूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. आरोग्य विभाग आणी ग्रामपंचायत केम यांच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमाचा फायदा घेऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे आवाहन अजितदादा तळेकर यांनी ग्रामस्थांना केले आहे

Related posts