अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – अक्कलकोट पंचायत समितीच्या शिक्षण विभाग यांच्या वतीने ऑक्सिमिटर व थर्मलगन तालुक्यातील माध्यमिक शाळांना पंचायत समितीचे सभापती सौ सुनंदा गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे,माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड, शिवू स्वामी उपस्थित होते .
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे म्हणाले की,येणाऱ्या २७ जानेवारी पासून इयता ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरू होणार आहेत, तरी शासनाने ठरवुन दिलेल्या कोविड नियम व अटी काटेकोरपणे पाळून सुरू कराव्यात,सर्व नियमाचे पालन करावे, असे आवाहन केले,
याप्रसंगी अक्कलकोट तालुक्यातील माध्यमिक मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धू इटकर यांनी केले,तर सर्व उपस्थितांचे आभार सिद्रामय्या स्वामी यांनी मानले.