काही महिन्यांपूर्वी बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले होते. आता पुन्हा त्याच चर्चेला नवे वळण लागले आहे. धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे. करुणा धनंजय मुंडे यांनी आपल्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे मुंडे यांच्या आयुष्यात खळबळ माजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
करुणा धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट काय म्हटले आहे
“माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे,” असं सांगत करुणा धनंजय मुंडे यांनी सोबत फोटो शेअर केला आहे. यामध्ये एक प्रेमकथा लवकरच असा उल्लेख असून खाली आश्चर्यजनक प्रेमकथा असेही लिहिण्यात आलेलं दिसत आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर खासगी आयुष्याबद्दल खुलासा करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातूनच खुलासा करत, “तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा हिच्याशी आपला काहीएक संबंध नाही. तिची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी परस्पर सहमतीनं मी संबंध ठेवले होते. तिच्यापासून मला दोन मुलं आहेत,” अशी कबुली दिली होती. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
मात्र तक्रार मागे घेतल्यानंतर हा वाद शमला होता. पण आता करुणा धनंजय मुंडे यांनी पुस्तक प्रकाशित करणार असल्याचं जाहीर केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
previous post