महाराष्ट्र

अधिकारी झाल्यावर लग्नाची मागणी अन् हत्या?

ज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवत अधिकारी झालेल्या दर्शना पवारची तिचाच मित्र राहुल हंडोरेने हत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी राहुल हंडोरेने दर्शनाने लग्नाला नकार दिल्यानं तिचा खून केल्याची कबुली दिली आहे. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. दर्शना आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते का? आधी प्रेमसंबंध आणि नंतर ते वेगळे झाले होते का? आधी प्रेमसंबंध संपवलेले असताना दर्शना अधिकारी झाल्यावर राहुलने तिला लग्नाची मागणी घातली का? असेच अनेक प्रश्न विचारले जात आहेत. याबाबत पोलिसांना विचारलं असता पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल गुरुवारी (२२ जून) पुण्यात पत्रकार परिषदेत यावर प्रतिक्रिया दिली.

दर्शना पवार आणि आरोपी राहुल हंडोरेंचं प्रेमप्रकरण होतं का? यावर अंकित गोयल म्हणाले, “दर्शना आणि आरोपी राहुल यांच्यात आधी प्रेमसंबंध होते का, ब्रेक अप झालं का याविषयी आम्हाला आत्ताच सांगता येणार नाही.”खून करण्याचं कारण सांगताना अंकित गोयल म्हणाले, “आम्हाला सखोल तपास करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. मात्र, प्राथमिक तपासात असं दिसतंय की, दर्शना पवारने राहुल हंडोरेला लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे त्याने दर्शनाचा खून केला. दोघांचीही खूप जुनी ओळख आहे. आरोपीला राहुलला दर्शनाबरोबर लग्न करायचं होतं. दर्शनाने या लग्नाला नकार दिला म्हणून राहुलने खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.”आरोपीही एमपीएससीची तयारी करत होता. तो गेल्या काही वर्षांपासून अर्धवेळ नोकरी करून स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. त्याने वेगवेगळ्या परीक्षाही दिल्या आहेत. सध्या तो वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये काम करत होता आणि एका रुममध्ये रहात होता. दोघांची ओळख लहानपणापासून होती,” अशी माहिती अंकित गोयल यांनी दिली.

Related posts