hacklink hack forum hacklink film izle hacklink lunchtime resultstürk ifşajojobetGrandpashabethepbet girisgrandpashabetjojobet
महाराष्ट्र

मोफत लसीकरणाबाबत उद्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : अजित पवार

मोफत लसीकरणाबाबत उद्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंगळवारी दिली. लसीचा तुटवडा संपूर्ण देशाला आहे. मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाली आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मोफत लसीकरणाबाबत उद्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. लसीबाबत जागतिक निविदा मागवणार आहोत. ज्यातून सरकारवर आर्थिक भार पडतो. त्याबाबत केवळ मुख्यमंत्री निर्णय घेतात, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांचे लसीकरण हे मोठे आव्हान आहे. यासाठी जवळपास साडेसात हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या सगळ्यासाठी सरकार तयार आहे, पण लसीची उपलब्धता ही मोठी बाब आहे. त्यासाठी आम्ही केंद्र सरकार, सीरम आणि भारत बायोटेक यांना पत्र लिहिले आहे. दोन दिवसांपासून त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
ते म्हणाले, एका दिवसात आठ लाख लसीकरण शक्य आहे. त्यासाठी पुरेशा लशी मिळणे गरजेचे आहे. लशींबरोबरच १० लाख रेमडेसीवीर व्हायल आणि ऑक्सिजन प्लांटसाठी ग्लोबल टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या टेंडरचा कालावधी तीन दिवसांचा आहे. सध्या सर्वजण लसीकरणासाठी एक तारखेची वाट पाहत आहेत. राज्यातील सर्वांसाठी लसीकरणासाठी जो खर्च येणार आहे त्याबाबत उद्याच्या कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार आहे. ही लस आर्थिक दुर्बल घटकाना मोफत द्यायची की सर्वांना याबाबत निर्णय होईल. ही लस विकत असो की मोफत त्यासाठी सर्व राज्ये तयार आहेत. पण लशीची उपलब्धता असणे ही मोठी बाबत आहे. केद्रीय आरोग्य सचिव, सीरम इनस्टिट्यूट, भारत बायोटेक या तिघांनाही दोन दिवसांपूर्वी पत्र लिहिले आहे. त्यांना उपलब्धतेबाबत विचारणा केली आहे. आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत.’

Related posts