कोरोनाचा धोका वाढत असल्याने शहरासह जिल्ह्यात कडक निर्बंध लादले आहेत. असे असतानाही कोरोनाचा आकडा वाढतच आहे. शुक्रवारी तर एका दिवसात दुसर्या लाटेतील सर्वाधिक 988 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील शुक्रवारी सर्वाधिक 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी शहरात सर्वाधिक 14 जणांचा, तर ग्रामीण भागात 5 जणांचा समोवश आहे.
शुक्रवारी ग्रामीण भागातील 7 हजार 56 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 6 हजार 315 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 741 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 418 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सोलापूर शहरातील 2393 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2146 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 247 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 156 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मृत्यू पावलेल्यांमध्ये ग्रामीण भागातील माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी येथील 59 वर्षांची महिला, बार्शी तालुक्यातील खामगाव येथील 73 वर्षीय पुरूष व बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉट येथील 58 वर्षाची महिला, दक्षिण सोलापूर तालुक्यातील तोगराळी येथील 48 वर्षीय पुरूष व पंढरपूर शहरातील सुलेमान चाळ येथील 75 वर्षाची महिलेचा समावेश आहे. याबरोबर शहरात आदर्शनगर, दहिटणे परिसरातील 72 वर्षाची महिला, अंबिकानगर, बाळे येथील 64 वर्षीय पुरूष, मुरारजी पेठ येथील 63 वर्षाची महिला, शिक्षक सोसायटी, सैफुल येथील 60 वर्षाची महिला, धुम्मा वस्ती, रेल्वेलाईन्स येथील 61 वर्षीय पुरूष, गंगाधर सोसायटी, होटगी रोड येथील 68 वर्षीय पुरूष, रिलायन्स टॉवरजवळ, भवानी पेठ येथील 82 वर्षीय पुरूष, नरसिंहनगर, मोदीखाना येथील 42 वर्षीय पुरूष, वैष्णवीनगर, विजापूर रोड येथील 67 वर्षाची महिला, नीलम श्रमजीवीनगर, एम.आय.डी.सी. येथील 59 वर्षीय पुरूष, एकतानगर, न्यू पाच्छा पेठ येथील 78 वर्षाची महिला, भवानी पेठ येथील 75 वर्षाची महिला, जवाहरनगर, शेळगी येथील 73 वर्षीय पुरूष, देशमुख-पाटील वस्ती येथील 61 वर्षाची महिलेचा मृत्यू झाला आहे.
