hacklink hack forum hacklink film izle hacklink chicken roadrocket playrocket playlunchtime resultsDENEME BONUSUjojobetholiganbetjojobetsüperbetinsüperbetin girişsüperbetinsüperbetin girişsüperbetinsüperbetin girişbetcio
महाराष्ट्र

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट मुंबईसह राज्यावरही धडकली आणि पाहता पाहता नियंत्रणात असणारा हा संसर्ग हाताबाहेर गेला. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे, की सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी नव्यानं कोविड सेंटरच्या उभारणीचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. ही सर्व परिस्थिती, रुग्णांसाठी बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजन पुरवठा याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आढावा घेतला. ज्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ही लाट म्हणजे त्सुनामी असल्याचं म्हणत नागरिकांना सतर्क केलं.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, याबाबतची माहिती देत असताना सध्याच्या घडीला नागरिकांचा जीव वाचवणंच प्रशासनासाठी प्राधान्यक्रमावर आहे, असं त्या म्हणाल्या. शिवाय सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या लॉकडाऊनच्या चर्चांनाही त्यांनी स्पष्ट नकार दिला नाही. त्यामुळं येत्या काळात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वबाजूंनी विचार करत निर्बंध कठोर केले जाऊ शकतात ही बाब समोर आली.
‘कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून कोणीही वाचू शकत नाही हे सर्वजण जाणतो. याच परिस्थितीमध्ये राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील वर्षभरात आव्हानाच्या परिस्थितीमध्ये समर्थपणे जबाबदारी पार पाडली. सर्वांनी याकडे वेगळ्या नजरेतून पाहावं, नागरिकांनी जबाबदारीनं वागावं. सर्वजण आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. पण, जीव यातही वाचणं सर्वात महत्त्वाचं आहे. सर्वांनीच व्यवस्थितरित्या ही जबाबदारी सांभाळली, कोरोनासाठी आखून दिलेले प्रतिबंधात्मक नियम पाळले तर, कोरोनाचं हे जीवघेणं संकट आपण टाळू शकतो’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related posts