23.1 C
Solapur
September 13, 2025
अक्कलकोट

वटवृक्ष मंदिरात कोजागरी पौर्णिमा साजरी.

अक्कलकोट (प्रतिनिधी )  – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे कोजागरी पौर्णिमा मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रध्देने साजरी करण्यात आली.

सायंकाळी ७ वाजता देवीच्या गर्भदेवालयाचे विधीवत पुजा करुन द्वार उघडण्यात आले. यानंतर पुरोहित मंदार पुजारी व ब्राम्हणांच्या मंत्रोच्चारात मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते विधिवत लघुरुद्र करुन देवीस महानैवेद्य व कोजागरी पौर्णिमेस विशेष मान असणारे मसाला दुध प्रसाद अर्पण करण्यात आले. यानंतर मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे यांच्या हस्ते उपस्थित भाविकांना मसाला दुध प्रसाद वाटप करण्यात आले. उपस्थित असलेल्या देवी भक्तांनी याप्रसंगी या दुध प्रसादाचा लाभ घेतला. अशा प्रकारे यंदाच्या कोजागरी पौर्णिमेची सांगता भक्तिमय वातावरणात झाली.

यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, महेश गोगी, प्रा. शिवशरण अचलेर, प्रसन्न हत्ते, सैदप्पा इंगळे, श्रीशैल गवंडी, संजय पवार, सागर गोंडाळ, अविनाश क्षीरसागर, गिरीश पवार, श्रीपाद सरदेशमुख, सिद्धाराम कुंभार, प्रसाद सोनार, सचिन हन्नूरे, लखन गवळी, विपुल जाधव आदींसह अनेक स्वामी व देवीभक्त उपस्थित होते.

Related posts