पंढरपूर

भाजपाचे कल्याण काळे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादीत प्रवेश

काळे यांच्या प्रवेशाने विठ्ठल परिवार आणि राष्ट्रवादी मध्ये उत्साह वाढला.

पंढरपूर : प्रतिनिधी/

पंढरपूर तालुक्यात पूर्वीपासूनच कोणतीही निवडणूक असली की विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार यामध्ये होत असते, पर्यायाने मागील 2009 पासूनही त्याच धर्तीवर विधानसभा निवडणुकही लढली गेली आहे.

या पोटनिवडणुकीतही अशाच प्रकारे चित्र होणार होते, चेअरमन कल्याणराव काळे हे भाजपात होते. तरीही त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारात कसलाही सहभाग दाखविला नव्हता. यामुळे थेट कल्याणराव काळे यांनीच विठ्ठल परिवार एकत्रित राहावा यासाठी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केल्यामुळे भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला भलतेच गेटअप आले आहे.

पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भरतानाना भालके निधन झालेल्या या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणुक सुरू आहे. यामध्ये विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
या भालके यांच्या उमेदवार प्रचारात काहीसा जाणतेपणा कमी जाणवत होता. त्यामुळे वेगळी चर्चा चर्चा होत होती, परंतु विट्ठल परिवाराचे नेतेच भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे एक भारदस्तपणा आला असून विट्ठल परिवार आणि राष्ट्रवादी मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

मागील अनेक निवडणुका या विट्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार मध्ये होतात, ही निवडणूक ही अगदी त्याच वळणावर येऊन ठेपली आहे. पांडुरंग परिवार हा परिचारक गटाचा आहे. या परिवाराची प्रचार यंत्रणा भाजप चे उमेदवार समाधान आवताडे यांच्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील ही निवडणूक विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार यातच सुरू असल्याचे दिसत आहे.

Related posts