उस्मानाबाद प्रतिनिधी-सलमान मुल्ला
शहरातील प्रसेना प्रतिष्ठानच्यावतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही रविवार, 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील नऊ वर्षांपासून प्रसेना प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग असलेल्या रक्तदान शिबीर आयोजनाला यंदा नऊ वर्षे पूर्ण होत आहेत.
आजवर सहाशेहून अधिक रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले आहे. विशेष म्हणजे या शिबिरात महिलांचा सहभाग कौतूकास्पद होता. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्त, रक्तघटकांची आवश्यकता अधिक भासत असल्याने यावर्षी जास्तीत जास्त रक्तदान करण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप बनसोडे यांनी केले आहे. या उपक्रमासाठी प्रसेनजित सरवदे, प्रज्योत बनसोडे, अमर माळाळे, सचिन डोंगरे, शैलेंद्र शिनगारे, राजाभाऊ जाधव, यशवंत माळाळे, क्षमीनल सरवदे, नागराज साबळे, जीवन भालशंकर, निखिल शिरसाट, स्वप्नील बनसोडे, दादासाहेब मोटे, अजित बनसोडे, मंगेश डावरे, पृथ्वीराज सरवदे, राज कसबे,अमर विधाते आदी परिश्रम घेत आहेत.