26.3 C
Solapur
September 29, 2023
Blog

निसर्गाची किमया–नवल नवलाई

निसर्गाची किमया–नवल नवलाई

लेखक
श्री देविदास पांचाळ सर
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापुर.

भारतीय संस्कृतीत शेतीला भूमी जननी-माता आई अशा अनेक नावांनी संबोधले जाते त्यात नवल काहीच नाही कारण शेतीतून आपल्याला धनधान्य धनसंपदा मिळते म्हणून काळी आई धन धान्य देई असेसुद्धा म्हणतात पण मित्रांनो निसर्ग कधी काय चमत्कार करेल याचा नेम नाही कधी आपल्याला काय चमत्कार दाखवेल ते सांगता येत नाही आता हा पहा शेतातील उभ्या धान्याचा फोटो फोटो पाहून आपल्याला आश्चर्य झाल्याशिवाय राहत नाही हिरवाईने नटलेली we’re हिरवा शालू परिधान करून केस मोकळे सोडून आपले सौंदर्य धान्याच्या रूपाने आपल्याला दाखवणारे खरोखरच ती धनलक्ष्मी दिसते साक्षात शेतातील धनलक्ष्मी चे दर्शन आपल्याला होते धन्य ती धनलक्ष्मी माता धन्य तो निसर्ग धन्य ती काळी आई ! धन्य ते लक्ष्मी माता म्हणतात ना काळ्‍या आईची माया कशी जाईल वाया लई दिवसान ना लई नवसान भरभरून पीक देणारी शेतकऱ्यांच्या कष्टाला श्रमाला यश देणारी काळी आई इ क दाणा पेरला तर हजारो मोती देणारी आई शेतकर्‍यांच्या कष्टाचे मोल करणारी काळी आई धन्य ते धनलक्ष्मी धन्य ते निसर्ग माता अशा या निसर्ग देवतेला त्रिवार वंदन🙏🏻🙏🏻🙏🏻

Related posts