23.1 C
Solapur
September 13, 2025
महाराष्ट्र

कृषीमंत्री कोकाटेंच्या वक्तव्यानं संताप,

जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावं. कर्ज घ्यायचं आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचं नाही असे मामिकराव कोकाटे म्हणाले. तसेच कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का? असा सवाल त्यांनी केला होता. सरकार तुम्हाला शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा,” असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं.
कर्जमाफीच्या (loan waiver) पैशातून शेतकरी लग्नात उधळपट्टी करतात अशा आशयाचे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विविध स्तरातून टीका होताना दिसत आहे. या मुद्यावरुन किसान सभा देखील आक्रमक झाली आहे. सरकारच्या धोरणांचा परिणाम म्हणून शेतकरी किती अडचणीत आहेत याची काडीची जाणीव नसल्यानेच कृषीमंत्री मामिकराव कोकाटे यांनी असे विधान केले असल्याची टीका किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

Related posts