24.4 C
Solapur
September 23, 2023
भारत

४८ तासांच्या शोधमोहिमेनंतर अखेर सैनिकांचे मृतदेह सापडले

जम्मू -काश्मीरच्या पूंछमध्ये गुरुवारी संध्याकाळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत बेपत्ता झालेल्या कनिष्ठ कमिशन्ड ऑफिसरसह (जेसीओ) दोन जवानांचे मृतदेह लष्कराने परत मिळवले आहेत. लष्कराने या भागात मोठे कोम्बिंग ऑपरेशन सुरू केल्यानंतर आणि दहशतवाद्यांना लपवल्याचा संशय असलेल्या जंगलांवर जोरदार हल्ला केल्यानंतर ४८ तासांनी मृतदेह बाहेर काढण्यात आले.सापडलेल्या मृतदेहांपैकी ९ मृतदेह लष्कराच्या जवानांचे आहेत. एकाच चकमकीत ठार झालेल्या जवानांचा हा गेल्या काही दिवसातला सर्वाधिक आकडा आहे.

Related posts