बॅंकेतील आर्थिक घोटाळे:-बहुजन विकास मोर्चाचा आरोप
जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कळंब:-येथील भारतीय स्टेट बँक कळंब च्या शाखेत वयोवृद्ध व्यक्ती व अबाल महिला विधवा महिला आदींच्या पगारी ह्या शाखा कळंब एसबीआय मार्फत होतात पण एसबीआयच्या अधिकारी व कर्मचारी यांची दादागिरी बँकेत मोठ्या प्रमाणात दिसून येत असून अवार्च भाषेत वयोवृद्धांना व महिलांना राजरोसपणे बोलण्याचे काम अधिकारी व कर्मचारी करतात.
तसेच बँक हे आर्थिक व्यवहाराचे प्रमुख केंद्र असल्यामुळे बँकेत खुलेआम अफरातफरी घोटाळे भ्रष्टाचार चालू असून गैरमार्गे कमवलेला पैसा इतर इसमाच्या खोट्या नावाने बँकेत ठेव म्हणून ठेवली जाते आहे बऱ्याच सह्या खोट्या नावाने. भ्रष्ट कर्मचारी पैसे खाऊन घेत असून यापूर्वी बरेच उच्चपदस्य अधिकारी गजाआड गेले आहेत स्टेट बँकेचे उप व्यवस्थापकीय संचालक गेल्यावर्षी सीबीआयने अटक केली होती..
त्यांच्या कॅबिनमध्ये ओमेगा व रोलेक्स घड्याळ व मौल्यवान मोबाईल सापडली होती दिल्लीच्या एका कंपनीस त्यांनी 75 कोटी रुपयांचे कर्ज सहमत केले होते व या कंपनीचा जो सल्लागार होता तो पूर्वी स्टेट बँकेत नोकरीस होता असे एक ना अनेक असे उदाहरण आहेत ‘जर का आपण संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचा योग्य तपाससाठी पाठपुरावा सुरु केला..
तर खुप मोठा घोटाळा उघडकीस येईल कळंब तसेच शाखा कळंब एसबीआय मध्ये राजरोसपणे होणारा भ्रष्टाचार व वृद्ध महिलांची मानहानी जर का येणाऱ्या काळात बंद नाही झाली तर कळंब एसबीआयच्या अधिकार्यांना व कर्मचार्यांची गाढवावरून धिंड काढण्यात येईल अशी मागणी बहुजन विकास मोर्चा द्वारे करण्यात आली आहे
यावेळी राहुल हौसलमल. जिल्हाध्यक्ष बहुजन विकास मोर्चा.सिद्धार्थ वाघमारे, गोविंद अंधारे, आकाश जाधव, नामदेव काळे आदींच्या उपस्थित होते व त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत…
कळंबच्या भारतीय स्टेट बॅंकेमध्ये राजरोसपणे होणारा भ्रष्टाचार व वृद्ध महिलांची मानहानी जर का येणाऱ्या काळात बंद नाही झाली तर कळंब एसबीआयच्या अधिकार्यांना व कर्मचार्यांची गाढवावरून धिंड काढण्यात येईल.
राहुल हौसलमल जिल्हाध्यक्ष बहुजन विकास मोर्चा