33.9 C
Solapur
February 21, 2024
महाराष्ट्र

मालकाच्या गोदामासाठी नागाशी दिली झुंज दंश झाल्याने सोडला जीव

भोगाव येथील एका गोदामामध्ये शिरणाऱ्या नागाला अडवणाऱ्या ज्युलीचा (श्वान) मृत्यू झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्ती केली जात आहे. गोदामाचे रक्षण करताना ज्यूलीने नागाला तोंडात पकडलं होतं. यादरम्यान झालेल्या झटपटीत नागाने चावा घेतल्याने ज्युलीला प्राण गमवावे लागले.ज्युली जोरजोराने भुंकत असल्याने सुरक्षारक्षक पाहण्यासाठी कंपाउंडमध्ये आला असता त्याला तीन फूट लांबीचा नाग दिसला. गोदामात शिरू पाहणाऱ्या नागाला ज्युलीने बाहेरच अडवून तोंडात धरलं होतं. नागाला ज्युलीने तोंडात धरल्याने त्याने चावा घेतला.

Related posts