hacklink hack forum hacklink film izle hacklink lunchtime resultsGrandpashabetjojobetgrandpashabethepbet girisjojobetjojobetgrandpashabet
उस्मानाबाद 

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील 120 किमी लांबीच्या 17 रस्त्यांसाठी 101.46 कोटी निधी मंजुर ; खा. ओमराजे निंबाळकर यांची माहिती

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील 120 किमी लांबीच्या 17 रस्त्यांसाठी 101.46 कोटी निधी मंजुर झाल्याची माहिती खा. ओमराजे निंबाळकर यांनी दिली.

जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अतिवृष्टीमुळे व वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात खराब झाली होती. सदरील सर्व खराब रस्त्याने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्णांना ये-जा करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या. संबंधीत परिसरातील नागरिकांकडून रस्त्यांची दुरुस्ती करणेबाबत लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाच्या उप अभियंता, कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्या समवेत कृती आराखडा तयार करण्यात आला होता. सदर रस्त्यांच्या मंजुरीसाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री मा.नरेंद्रसिंह तोमरजी व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे संचालक श्री इंद्रेशकुमार पटेरिया यांच्याकडे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सदर रस्त्यांच्या पुन:निर्माणासाठी पाठपुरावा केला. सदर पाठपुराव्याला यश आले असून जिल्ह्यातील रस्त्यानंसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निधी मंजूर झाला आहे.

यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील
1) बरमगाव (बु) ते राज्य मार्ग 238 – रुईभर – गौडगाव – अनसुर्डा रस्ता 767.51 लक्ष
2) तेर-बुकनवाडी- गोरेवाडी तालुका सरहद्द पर्यंत रस्ता 938.42 लक्ष
3) घाटंग्री ते खताळवाडी-गडदेवदरी-कुमाळवाडी रस्ता 707.55 लक्ष

तुळजापूर तालुक्यातील,
1) जळकोट-मानमोडी-चिंचखोरी तांडा रस्ता 734.06 लक्ष
2) जळकोट ते जळकोटवाडी रस्ता 471.38 लक्ष
3) वानेगाव ते सलगरा (दि) रस्ता 676.3 लक्ष

उमरगा तालुक्यातील गुंजोटी ते एकोंडी (ज)-एकोंडीवाडी-दाबका रस्ता 732.75 लक्ष

लोहरा तालुक्यातील जुना माकणी रस्ता ते जुना सास्तुर रस्ता 530.64 लक्ष

कळंब तालुक्यातील 1) उपळाई- संजीतपुर रस्ता 232.35 लक्ष.
2) बोरवंटी- कोथळा- हिंगणगाव रस्ता 355.44 लक्ष.
3) शिराढोण-ते रायगव्हाण- जायफळ रस्ता 429.42 लक्ष
4) राज्यमार्ग 241 – नागझरवाडी ते तालुका सरहद्द रस्ता 549.82 लक्ष.

भूम तालुक्यातील 1) दुधोनी ते जिल्हा सरहद्द रस्ता 483.28 लक्ष

परंडा तालुक्यातील आवाडपिंपरी- वडनेर- ढगपिंपरी- आसू रस्ता 749.56 लक्ष.
2) चिंचपुर (खुर्द)- माणिकनगर रस्ता 867.02 लक्ष.
वाशी तालुक्यातील 1) वाशी ते सरमकुंडी रस्ता 448.24 लक्ष.
2) वाशी ते गोलेगाव-ईसरुप-खानापूर रस्ता 472.28 लक्ष अशा एकूण जिल्ह्यातील 120 किमी लांबीच्या 17 रस्त्यांसाठी एकूण 101.46 कोटी निधी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजुर झाला आहे अशी माहिती खा. ओमराजे निंबाळकर यांनी दिली.

Related posts