पंढरपूर

राज्य सरकारने अकलूज नगरपरिषद तर नातेपुते नगरपंचायत मध्ये केले रूपांतर – संभाजीराजे शिंदे

पंढरपूर(प्रतिनिधी):-
आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अकलूजचे रूपांतर नगरपरिषदेत होण्यासाठी तसेच नातेपुते पंचायत समितीचे रूपांतर नगरपंचायत मध्ये होण्यासाठी महत्त्वाची भूमिका शिव संपर्क अभियानाच्या निमित्ताने गेल्यानंतर अकलूज येथे सुरु असलेल्या आंदोलनकर्त्यांशी सुसंवाद साधला त्यानंतर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा प्रस्ताव सादर करताच दोन्ही मागण्या या सरकारने पूर्ण केल्या सरकारमध्ये कुठेही मतभेद नाही हे यावरून दाखवून दिले आहे. त्यामुळे विरोधकांनी कोणत्याही गोष्टीचे भांडवल करून सरकार मध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करू नये आणि तो यशस्वी होणार नाही असे शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजी राजे शिंदे यांनी सांगितले.
ते सरकोली येथील शिवसंपर्क अभियानाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

पंढरपूर तालुक्यातील तालुक्यात ८ गट व १६ गणांमध्ये जात असताना त्या त्या ठिकाणच्या नागरिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेऊन शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य शिवसंपर्क अभियानातून करत असतानाच नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत गरजा गावठाणाची समस्या, पिण्याचे पाण्याची समस्या असेल, घरकुलाची समस्या असेल, नादुरुस्त रस्त्याची समस्या असेल, एमएसईबीची समस्या असेल, शेतकऱ्याचे ट्रांसफार्मर जाळण्याच्या समस्या असतील या सर्व समस्या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून सोडविण्याचे कार्य करण्यात येत आहे.

दरम्यान गांव तिथे शाखा घर तेथे शिवसैनिक बरोबरच ज्या गांवांमध्ये शाखा नाहीत अशा ठिकाणी नव्याने शिवसेना व युवासेना तसेच महिला आघाडी यांच्या शाखा स्थापन करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सुचनेप्रमाणे शिवबळ वाढविण्याचे कार्य करण्यात येणार आहे.

शिव संपर्क अभियानाअंतर्गत पंचायत समिती गणामध्ये व जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये जात असताना याठिकाणी नागरिकांना कोरोनाचा वाढता संसर्ग भेडसावत असल्याने त्या ठिकाणी कोवीडची पहिली लस मिळाली आहे का? मिळाली नसेल तर किती नागरीक वंचित आहेत. ज्या ठिकाणी कोवीडची पहिली लस मिळाली आहे त्या ठिकाणी दुसरी लस मिळाली का? या बाबतचा पाठपुरावा करण्यात आला. तसेच नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून दिला जाणारा धान्य व्यवस्थित मिळतो का? पंतप्रधान योजनेतील अन्नधान्य आज अशा बिकट प्रसंगी लोकांना आधार देण्याचे काम करत आहे. शिव संपर्क अभियानातून कार्य करत असताना प्रत्येक गावची समस्या ही वेगळी असल्याचे दिसून येते आज रांजणी, सरकोली, पुळूज, याठिकाणी शिव संपर्क अभियान राबविण्यात आला.

यावेळी पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष संभाजी राजे शिंदे तालुका प्रमुख महावीर देशमुख, शंकरगांव ग्रामपंचायत सदस्य संजय म्हमाणे,साहेबराव बाबर,उमेश पाटील ,शिवाजी पांढरे,संतोष भोसले,सतिश चव्हाण,बंडू मोरे,(पुळूज) ,सरकोली पतसंस्थेचे चेअरमन पांडुरंग भोसले,नागनाथ भोसले,रामचंद्र कराळे,दत्तात्रय भोसले,उत्तम कराळे, अजित भोसले,जनार्दन भोसले,(सरकोली).आदिंसह जेष्ठ्य नागरिक,
शिवसेनेचे पदाधिकारी गाव पातळीवर कार्य करणारे शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून गाव तिथे शाखा घर तेथे शिवसैनिक अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या संपर्क अभियान याप्रसंगी राज्य सरकारच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात येत आहे त्याच बरोबर नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून पंढरपूर विभागातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक काम करत आहे नागरिकांच्या अडचणी व समस्या शिव संपर्क फार्म द्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार असून घराघरात मनामनात शिवसैनिक तयार व्हावा अशी भूमिका या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती शिवसेनेचे पंढरपूर तालुका प्रमुख महावीर देशमुख यांनी दिली.

पंढरपूर जिल्हा निर्मिती साठी प्रयत्न-

[ पंढरपूर जिल्हाची निर्मिती व्हावी ही जनतेची मागणी असल्याने शिव संपर्क अभियाना नंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे आपण स्वतः विनंती करणार असल्याचे पंढरपुर विभागाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी सांगितले. १९९५ साली लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी पंढरपूर जिल्हा निर्मितीची भूमिका मांडली होती ती भूमिका पूर्ण करण्यासाठी व जनतेची मागणी अस्तित्वात आणण्यासाठी दक्षिण काशी म्हणून ओळख असलेले पंढरपूर हा जिल्हा निर्मिती व्हावा याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संभाजी राजे शिंदे यांनी दिले.

Related posts