पंढरपूर

पंढरपूरातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने पूर्ववत सुरू करण्यात यावी – दिलीप (बापु)धोत्रे

(पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांची सर्व दुकाने सुरू करण्यासाठी मुख्याधिका-यांना सर्व व्यापारी व मनसेच्या वतीने निवेदन)

प्रतिनिधी

पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांची सर्व दुकाने सुरू करण्यात यावीत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले तसेच पंढरपूर शहरातील सर्व व्यापारी बांधवांनीही निवेदन दिले.

गेल्या वर्षात कोरोनामुळे लॉकडाऊन लावला होता त्यावेळेस देशासह राज्यात ही छोटे-मोठे व्यापा-यांचे उद्योग व्यवसाय बंद होते अशातच राज्य सरकारने आठवडा लाव डॉन सुरू केला होता त्यानंतर कळत-नकळत अचानकच पूर्ण करण्याचा निर्णय घेतला अशा परिस्थितीमध्ये व्यापारी तर लांबच शेतकऱ्यांना सुद्धा शेतीमाल विकण्यासाठी अडचणी येऊ लागले आहे. यामुळे पंढरपुर शहरातील छोटे-मोठे व्यापाऱ्यांची दुकाने उघडण्यात यावे असे आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस मा.दिलीप बापू धोत्रे यांच्या सह सर्व छोटे-मोठे व्यापा-यांनी मिळून पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मानोकर यांना देण्यात आले

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,पोलीस निरीक्षक अरुण पवार, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर,तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, नागेश इंगोले, महेश पवार, सचिन घोडके, शुभम काकडे,वैभव इंगोले, सर्व व्यापारी बांधव उपस्थित होते

Related posts