24.4 C
Solapur
September 23, 2023
महाराष्ट्र

‘चाचा विधायक है हमारे’

Tanmay Fadnavis Memes कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण प्रक्रियेलाही चांगलाच वेग मिळाला आहे. देशात सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. तर येत्या 1 मेपासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. असं असलं तरीही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने त्याआधीच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचं सोशल मीडियावर सांगितलं, आणि मग काय; काँग्रेससह अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.तिथे महाराष्ट्र काँग्रेसने ट्वीट करुन “फडणवीस यांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?” असा प्रश्न उपस्थित केला असतानाच दुसरीकडे ट्रोलर्सनाही आता एक नवा विषय मिळाला असून, तन्मय फडणवीसच्या नावे असंख्य मीम्स व्हायरस केले जात आहेत.
Corona Vaccination Phase 3: लसीकरणाचा वेग वाढणार, 18 वर्षांवरील सर्वांना लसीसह केंद्राचे ‘हे’ देखील महत्वाचे निर्णय
चित्रपट, वेब सीरिजमधील संवादांचा संदर्भ देत हे मीम्स सध्या कमालीचे ट्रेंडमध्ये आले आहेत. चाचा विधायक है हमारे, हे मीम सध्या चांगलंच लक्ष वेधून जात आहे. तर तन्मय कसा फसला, यासंदर्भातील एक मीमही सोशल मीडियावर दिसून येत असून, त्याच्यावर या माध्यमातून निशाणा साधला जात आहे.

Related posts