अक्कलकोट

होटगी येथील अपेक्स गारमेंट कंपनीत आधार कार्ड दुरुस्ती व नवीन आधार कार्ड काढणे शिबिराचे आयोजन

अक्कलकोट प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील अपेक्स गारमेंट कंपनीत आधार कार्ड दुरुस्ती व मोबाईल लिंक, नवीन आधार कार्ड काढणे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 24 मार्च ते दिनांक 26 मार्च असे तीन दिवसाचे शिबिर घेण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन महा आयटी, महाऑनलाईनचे जिल्हा व्यवस्थापक रिजवान मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत गारमेंटचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शफी इनामदार होते .याप्रसंगी वरिष्ठ सहाय्यक अभियंता आशिष देशमुख ,जय ऐज्युटेक्नोचे आसिफ यत्नाळ, अपेक्स गारमेंटचे मालक राजेश पटेल, सरपंच लक्ष्मीबाई गायकवाड ,उपसरपंच आसिफ शेख, शिवकुमार कुंभार, आयोजक मुनाफ चिरके आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना शफी इनामदार म्हणाले, कामगारांनी उद्योग वाढीसाठी प्रयत्न करावे. आपल्या कामाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. सध्या सोलापुरातील कापड उद्योग बंद पडले आहेत .गारमेंट उद्योगाला चांगले दिवस येणार आहेत. आपण मेहनत घेऊन संस्थेचा फायदा करावा. ही गारमेंट कंपनी चांगली चालली तर इतर अनेक कंपन्या या उद्योगाकडे येणार आहेत. यामुळे हजारो महिलांना, पुरुष कारागिरांना, कामगारांना काम मिळेल. होटगी परिसरात उद्योग-व्यवसाय वाढतील असे यावेळी त्यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना राजेश पटेल यांनी कंपनीत शिलाई मास्टर ,कामगारांची गरज आहे .एकूण 150 कामगारांची सध्या गरज आहे .अनुभवी शिकाऊ कामगारांची गरज कंपनीला आहे. कंपनीमुळे रोजगाराची संधी मिळणार आहे. ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यानी होटगी येथील अपेक्स गारमेंट कंपनीशी संपर्क करावा असे आवाहन केले.

याप्रसंगी रिजवाना मुल्ला, आसिफ यत्नाळ, आशिष देशमुख आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास रवी चिवडशेट्टी , इरण्णा किणगी, आदम मुजावर ,बापू घोरपडे, कंपनीच्या एचओ प्रांजली सहारे, संगणक परिचालक मुजफ्फर रंगरेज ,प्रशांत मकनापुरे, जावेद तांबोळी , गजप्पा गजा, जनरल मॅनेजर अमरनाथ निगम ,सुनिता निगम, कुमार टेलर, निरंजन स्वामी, शबाना शेख आदींसह कंपनीतील कामगार वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुनाफ चिरके यांनी केले.

Related posts