उत्तर सोलापूर

लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात ऑनलाईन राष्ट्रीय कृषी शिक्षण दिन साजरा

श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान, वडाळा संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी शिक्षण दिन कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने दि. ३ डिसेंबर,२०२० रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजित पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्योती गायकवाड यांनी प्रास्ताविक केले व राष्ट्रीय कृषी शिक्षण दिनाचे महत्व स्पष्ट केले.
रासेयो स्वयंसेविका वैष्णवी गव्हाणे व स्वयंसेवक ऋषिकेश फडके यांनी देखील राष्ट्रीय कृषी शिक्षण दिनाबद्दल आपले मत व्यक्त करताना कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी प्रयोगशील राहणार असल्याचे नमूद केले. तसेच प्रा. एन. के. गोसावी व प्रा. के. एस. धाडवे यांनी देखील राष्ट्रीय कृषी शिक्षण दिनाबद्दल आपले विचार व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजित पाटील यांनी सर्व रासेयो स्वयंसेवकांना भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे कृषी खेत्रातील कार्य विषद केले. कृषी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन व विस्तार हि त्रिसूत्री विद्यार्थ्यांनी आत्मसात करून त्याचा प्रचार वा प्रसार करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तसेच विद्यार्थी व नवयुवक तरुण यांना कृषी क्षेत्रातील व्यावसायिक दृष्टीकोन व संधी दाखवून त्यांना या क्षेत्राकडे वळविण्यासाठी दिशा दाखवली पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्योती गायकवाड यांनी केले. व आभार प्रदर्शन रासेयो स्वयंसेवक शुभम सुर्वे याने केले. या कार्यक्रमाचे आयोजन गुगल मिट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

Related posts