पंढरपूर

नाराज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी माझी निवड : संजय पाटील (जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस उपाध्यक्ष)

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदार संघासह सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निरीक्षक म्हणून सुरेश घुले यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. नाराज कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याची जबाबदारी देखील पंढरपूर तालुका पक्ष निरीक्षक म्हणून श्री. घुले यांनीच माझ्यावर दिली आहे, अशी माहिती जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा पंढरपूरचे पक्ष निरीक्षक संजय पाटील यांनी दिली.

श्री. पाटील म्हणाले, गेल्या चार दिवसांपासून पंढरपूर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेण्यासाठी व त्यांच्यातील नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांनी माझी नियुक्ती केली आहे. दरम्यान, काही विघ्नसंतोषी लोकांनी माध्यमांना चुकीची माहिती देऊन गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आज झालेल्या बैठकीत या विषयावर देखील सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील गैरसमज दूर झाला आहे.

आगामी विधानसभेच्या पोटनिवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृह येथे आज बैठक झाली. बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. येणारी विधानसभेची पोटनिवडणूक सर्व ताकदीनिशी लढवून पक्षाने दिलेला उमेदवार विजय करण्याचा निर्धार देखील या बैठकीत करण्यात आला. येथील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.तसेच मते व भावना जाणून घेऊन त्यांचा सविस्तर आहवाल पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले यांच्याकडे दिला जाणार आहे.

—————————–
पंढरपुरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नाराज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी माझी निवड : संजय पाटील
(जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस उपाध्यक्ष)

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदार संघासह सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निरीक्षक म्हणून सुरेश घुले यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. नाराज कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याची जबाबदारी देखील पंढरपूर तालुका पक्ष निरीक्षक म्हणून श्री. घुले यांनीच माझ्यावर दिली आहे, अशी माहिती जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा पंढरपूरचे पक्ष निरीक्षक संजय पाटील यांनी दिली.

श्री. पाटील म्हणाले, गेल्या चार दिवसांपासून पंढरपूर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेण्यासाठी व त्यांच्यातील नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांनी माझी नियुक्ती केली आहे. दरम्यान, काही विघ्नसंतोषी लोकांनी माध्यमांना चुकीची माहिती देऊन गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आज झालेल्या बैठकीत या विषयावर देखील सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील गैरसमज दूर झाला आहे.

आगामी विधानसभेच्या पोटनिवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृह येथे आज बैठक झाली. बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. येणारी विधानसभेची पोटनिवडणूक सर्व ताकदीनिशी लढवून पक्षाने दिलेला उमेदवार विजय करण्याचा निर्धार देखील या बैठकीत करण्यात आला. येथील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.तसेच मते व भावना जाणून घेऊन त्यांचा सविस्तर आहवाल पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले यांच्याकडे दिला जाणार आहे.

—————————–
पंढरपुरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणतेही गट – तट नाहीत. सर्व कार्यकर्ते पक्षाचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी आजही खंबीपपणे उभे आहेत. विरोधकांनी हुरळून जाऊ नये, असा टोलाही संजय पाटील यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना लगावला. सर्व कार्यकर्ते पक्षाचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी आजही खंबीपपणे उभे आहेत. विरोधकांनी हुरळून जाऊ नये, असा टोलाही संजय पाटील यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना लगावला.

Related posts