अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – येथील श्री.वटवृक्ष देवस्थान हे राज्यातील एक प्रमुख तिर्थक्षेत्र आहे. राज्यासह मुंबई-पुण्यातील अनेक भाविकांचे श्री स्वामी समर्थ हे निस्सीम दैवत आहेत. या धरतीवर सहाजिकच मुंबई – पुण्याहून लोहमार्गाने स्वामींच्या भेटीकरीता अक्कलकोटी येणारे अनेक स्वामी भक्त आहेत.
अनेक नागरिक लोहमार्गाने प्रवास करून स्वामी दर्शनाकरीता येथे येत असतात. त्यामुळे लोहमार्ग पोलीस खात्यातून पुणे लोहमार्गावर कर्तव्य पार पाडताना व नागरीकांची मार्गदर्शनपर सेवा करताना नकळत जनसेवेच्या माध्यमातून स्वामी सेवा घडते त्यामुळे पुणे
लोहमार्ग पोलीस खात्यातील जनसेवा म्हणजे स्वामी सेवेचे प्रतिक असल्याचे मनोगत पुणे लोहमार्गाचे अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.
यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार, विपुल जाधव, महादेव तेली, रामेश्वर पाटील, भास्कर सापटणेकर, रियाज शेख इत्यादी उपस्थित होते.