उस्मानाबाद  तुळजापूर

मिलिंद नार्वेकर यांनी घेतले कुटूंबियासह तुळजाभवानी मातेचे दर्शन.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर – शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सपत्नीक तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. तुळजाभवानी मंदिर कार्यालयात त्यांचा तुळजापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

श्री.क्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव (उस्मानाबाद) येथे कुलस्वामिनी श्री.आई तुळजाभवानी मातेची विधीवत पूजा करून शिवसेना सचिव तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे स्विय सहाय्यक मिलिंदजी नार्वेकर यांनी सहकुटुंब दर्शन घेतले.

याप्रसंगी खासदार ओमराजे निंबाळकर, तुळजापूर तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, धाराशिव तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी, शहर प्रमुख सुधीर कदम, युवा सेना तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी, शहर प्रमुख सागर इंगळे सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर यांच्यासह इतर अनेक शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

Related posts