दक्षिण सोलापूर

मंद्रुप पोलीस ठाण्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा झाला गौरव.

अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर

आपल्या वरती होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या अन्यायाच्या विरोधात महिलांनी पुढे यावे. घरातच शांत न बसता पोलीसांना सांगावे त्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.


मंद्रुप पोलीस ठाण्यात आज महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

आज जागतिक महिला दिनानिमित्त मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच कलावती खंदारे होत्या. यावेळी सरकारी वकील अॅड. पंडित जाधव, साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे , फौजदार गणेश पिंगुवाले, जिल्हा परिषद सदस्य विद्युलता कोरे उपस्थित होत्या.

यावेळी सरपंच कलावती खंदारे, जिल्हा परिषद सदस्या विद्युलता कोरे, महिला सामाजिक कार्यकर्त्या अन्नपूर्णा लांडगे, महिला पोलीस पाटील वर्षाराणी बगले, निसार आत्तार, महानंदा पाटील व शांताबाई गायकवाड, महिला पोलीस शिपाई राणी कडसरे व रईसा शेख, मंद्रूप ग्रामीण रुग्णालयातील महिला डॉक्टर बागवान, आरोग्य सेविका प्रतिभा पुरंदरे, अंगणवाडी सेविका द्रोपती हाले या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. तसेच यावेळी महादेवी सूर्यवंशी यांच्या घरात चोरी झालेले सोन्याचे दागिने पोलिसांनी तपास करून आरोपींकडून हस्तगत करून त्यांना आज परत केले. तसेच परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज केलेल्या महिलांना नाहरकत पत्र देण्यात आले.

यावेळी बोलताना अँड जाधव यांनी महिलांविषयी असलेल्या कायद्याची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांनी महिलांनी आपल्यावर अन्याय होत असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे फौजदार गणेश पिंगूवाले यांनी सूत्रसंचालन केले.

Related posts