तुळजापूर

महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी संघटक पुणे येथील पदाधिकाऱ्यांचा तुळजापूर येथे शिवसेनेच्या वतीने सत्कार

साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद (धाराशिव)
प्रतिनिधी.

आज दि. 22 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी संगठनेच्या पदाधिकाऱ्यांनी तुळजापूर येथे आई तुळजाभवानी चे दर्शन घेतले. कोरोनामुळे अनेक दिवसांनी मंदिर उघडल्याने या पदाधिकाऱ्यांनी दर्शनासाठी तुळजापूर भेट दिली.

यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी संगठणेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा तुळजापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तुळजापूर चे युवासेना शहरप्रमुख सागर इंगळे व शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर,सोशल मिडीया विभाग प्रमुख महादेव पवार याच्या वतीने हा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी संघटक गोरख (भाऊ) मेंगडे व चंद्रकांत (आण्णा )मानकर यांनी उपस्थित शिवसैनिकांचे आभार मानले.

यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी संघटक गोरख (भाऊ) मेंगडे व चंद्रकांत (आण्णा )मानकर, हमाल पंचायत खजिनदार-हुसेन पठाण, खजिनदार-दत्ता डोबाळे, पुणे हमाल पंचायत सरचिटणीस-विष्णू तात्या गर्जे, चेरमन-संदीप धायगुडे, हमाल पंचायत सभापती, समाज सेवक अर्जुन भाऊ लोखंडे, विनोद दाजी गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांचा तुळजापूर येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी युवासेनेचे तुळजापूर शहरप्रमुख – सागर इंगळे, सोशल मीडिया चे तालुकाप्रमुख-चेतन बंडगर, सोशल मीडिया विभागप्रमुख-महादेव पवार, अक्षय काळे यांच्यासह अनेक शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

Related posts