पंढरपूर

भीमा नदीपात्रामध्ये कुंभार घाट येथील झालेल्या दुर्घटना ग्रस्त कुटुंबातील वारसांना नाम फाउंडेशन कडून मदत – माऊली हळणवर

सचिन झाडे
पंढरपूर –

पंढरपूर येथील भीमा नदी पात्रात बांधण्यात येत असलेल्या कुंभार घाटावरील बांधकामाची भिंत कोसळून पंढरपूर शहरातील चार जणांचा मृत्यू झाला होता. नाम फाउंडेशन चे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर व अभिनेत मकरंद अनासपुरे यांनी पश्चिम महाराष्ट्राचे नाम फाउंडेशन चे समन्वयक गणेश थोरात व जिल्हा समन्वयक माऊली हळणवर यांच्याकडून माहीती घेऊन पिडीतांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे.

नाम फाऊंडेशनकडून राज्यातील शेतकर्यांच्या प्रश्नावर काम करण्यात येते आहे.राज्यभरात शेतकर्यांच्या प्रश्नावर मदतीचा हात नाम फाउंडेशनने दिला आहे.जल संधारणा कामांबरोबरच पंढरपूर येथील कुंभार घाटावरील झालेल्या दुर्घटनेतील पीडीत कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.नाम फाउंडेशकडून पीडीत अभंगराव कुटुंबातील वारसांना मदतीचा धनादेश दिला आहे.

यावेळी धनादेश देताना माऊली हळणवर सामाजिक कार्यकर्ते उत्तम बाबा चव्हाण, नितीन काळे ,प्रवीण पिसाळ, गणेश अंकुशराव सचिन अभंगराव, नितीन अभंगराव, सोमनाथ अभंगराव ,अरुण कांबळे, वैभव अभंगराव, रामा कोळी, सुरज कांबळे, आदीसह निबंध उपस्थित कोळी बांधव उपस्थित होते.

Related posts