उस्मानाबाद 

इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह , उस्मानाबाद रुग्णालयात उपचार सुरू.

साईनाथ जगन्नाथ गवळी
(संपादक – मराठवाडा विभाग.)

इंग्लंडवरून उस्मानाबाद येथे आलेल्या एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद शहरातील एका 35 वर्षीय तरुणाचा रॅपिड अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्या रुग्णात सर्दी , खोखला अशी लक्षणे होती. या तरुणावर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून रुग्णात आढळून आलेल्या कोरोनाचा स्टेनच्या चाचणीसाठी नमुना पुणे येथे पाठविला आहे त्यावर आगामी 3 दिवसात अहवाल अपेक्षीत आहे.

आज उस्मानाबाद जिल्ह्यात 23 जण कोरोना पॉझिटिव्ह तर 147 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात आजवर 1 लाख 7 हजार 422 नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 16 हजार 384 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून पॉझिटिव्हीटी दर हा 15.27 टक्के आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 15 हजार 672 रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण 95.65 टक्के आहे तर 565 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे हे प्रमाण 3.44 टक्के आहे.

इंग्लंड येथून 8 दिवसापूर्वी उस्मानाबाद येथे तरुण आला असून तो कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याचा स्टेन अहवाल येईपर्यंत चिंतेत भर पडली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णापैकी 54 रुग्णांची स्तिथी काळजीची आहे त्यातील 33 जण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत तर 21 जण आयसीयूमध्ये आहेत व 3 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. मागील महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण जास्त असल्याने काळजी व कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Related posts