अक्कलकोट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिमप्रकाश मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘भिमप्रकाश मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थे’तर्फे शनिवार दि .०५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेमध्ये लोकापुरे मल्टीपर्पज हॉल अक्कलकोट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे आहे. जगावर कोरोनासारख्या महामारीने वेढा घातला आहे कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता होऊ नये रक्ताच्या अभावी कोणाचा अंत होऊ नये त्यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून सामाजिक बांधिलकी ठेवून चळवळीत भाग घेऊन रक्तदान करणे ही काळाची गरज आहे.

‘भिमप्रकाश मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थे’ तर्फे सामाजिक जबाबदारी म्हणून हे शिबिर होत आहे सकाळी नऊ ते सायं पाच वाजेपर्यंत हे शिबिर चालेल. तरी सर्वांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन भिमप्रकाश सामाजिक संस्थे संस्थापक अध्यक्ष- शिलामणी बनसोडे व पदाधिकारी यांच्या कडून करण्यात आले आहे.

Related posts