मोहोळ

कोरोणा काळात काळजी घ्यावी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील


उमेश पवळ
मोहोळ प्रतिनिधी

ग्रामपंचायत शेटफळ तालुका मोहोळ यांच्या वतीने covid-19 तपासणी अंतर्गत काही नागरिकांचे टेस्टिंग घेण्यात आले चाळीस टेस्ट घेण्यात आले विशेष म्हणजे 40 पैकी 39 टेस्टिंग निगेटिव्ह आले आहेत ही समाधानाची बाब आहे आपले गाव अद्याप पर्यंत सुरक्षित समजू शकतो यापुढे सर्वांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेतली
तर आपण आपले गाव कोरणा मुक्त करू शकू अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती चंचला पाटील यांनी शेटफळ तालुका मोहोळ गाव भेट प्रसंगी सांगितले शासनाच्या आवाहनानुसार 45 वयोगटातील वरील नागरिकांनी स्वच्छेने व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करून घेणे गरजेचे आहे गावातील ग्राम विकास अधिकारी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक अंगणवाडी सेविका व मदतनीस आशा वर्कर पोलीस बांधव या सर्वांनी लसीकरण करून घेतले आहे त्यापैकी कोणाला ही काही त्रास झाला नाही तरी गावातील सर्व प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक यांनी प्रथमत स्वत तपासून व आपल्या कुटुंबातील सदस्य पासून सुरुवात करून इतरांनाही प्रस्तावित करावे आपल्या काही अडचणी किंवा शंका असतील अनगर उपकेंद्र येथील सर्व वैद्यकीय टीम आपल्या मदतीला येतील अशी माहिती श्रीमती पाटील मॅडम यांनी दिली तरी सर्वांनी सकारात्मक विचार करून कोरोनाला हद्दपार करूया आणि आपले गाव कोरणा मुक्त करूया अशी घोषणा करण्यात आली याप्रसंगी पाटीलमॅडम तसेच गटविकास अधिकारी मोहोळ गणेश मोरे विस्ताराधिकारी बागवाले साहेब सुपरवायझर पवार मॅडम ,ग्राम विकास अधिकारी गणेश पवळ, यांच्या मार्गदर्शनानुसार आज झालेल्या टेस्टिंगसाठी पवार मॅडम सातपुते साहेब यांच्या टीमचे अभिनंदन करण्यात आले यावेळी शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी यांची मोलाचे सहकार्य लाभले

Related posts