पंढरपूर

इसबावी येथे तलाठी कार्यालय सुरू करण्याचे मा.नगरसेवक बालाजी मलपे यांची मागणी

सचिन झाडे
पंढरपूर –

पंढरपूर शहरातील सर्वात मोठे उपनगर असून दिवसेंदिवस या भागामध्ये नागरी वसाहत वाढत आहे.त्यामुळे इसबावी भागाकरिता स्वतंञ तलाठी कार्यालय करण्याची मागणी पंढरपूर नगरपरिषदेचे मा. नगरसेवक बालाजी मलपे यांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून इसबावी भागाचे तलाठी कार्यालय हे पंढरपूर तालुक्यातील इसबावी पासुन पाच ते सहा कि.मी. एवढ्या अंतरावर असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत येथे असून टाकळी व इसबावी असे दोन्ही भागांकरित एकञीत आहे.

तसेच इसबावी हा भाग जेंव्हा पासुन पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत घेण्यात आला. तेंव्हापासून या भागातील नागरी वसाहत झपाट्याने वाढत आहे.तसेच नागरिकांना कामांकरिता लागणारे महसुल कागदपञांसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. एकावेळी गेल्यानंतर लगेच काम होत नाही तर यासाठी ६ कि.मी.अंतर वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिकांना याचा गेल्या अनेक वर्षांपासून नाहक ञास सहन करावा लागत आहे.

इसबावी येथील नागरिकांची ही महत्त्वाची समस्या लक्षात घेऊन आज पंढरपूर नगरपरिषदेचे मा. नगरसेवक बालाजी मलपे यांनी इसबावी येथे स्वतंत्र तलाठी कार्यालय करण्याची मागणी पंढरपूर प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Related posts