तुळजापूर

किलज ग्रामपंचायत येथे भारतीय संविधान दिन साजरा.

पुरुषोत्तम विष्णु बेले
उस्मााबाद जील्हा प्रतिनिधी

किलज-तुळजापूर तालुक्यातील किलज येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे दि.२६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त भारतरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी किलज ग्रामपंचायत चे ग्रामसेवक सचिन चौधरी यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले.आणि ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सचिन चौधरी,सरपंच अर्चना शिंदे, उपसरपंच दिक्षा गवळी,पंचायत समिती सदस्य खंडूराज शिंदे,माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, माजी पोलीस उपनिरीक्षक. शिवराज मर्डे,मल्लिकार्जुन येलुरे,तानाजी मर्डे,ग्राम.सदस्य उमेश पवार,नामदेव गायकवाड,पार्वती धनराज शिंदे,प्रदीप शिंदे,गोविंद शिंदे,माजी ग्राम.सदस्य भरत गवळी,दगडू मस्के,तंटामुक्त अध्यक्ष.नागनाथ शिंदे,शिवाजी गायकवाड,गौतम गवळी,दिलीप पवार,हिराचंद गवळी,अंगद सोमवंशी,ग्राम.कर्मचारी हुजीर इनामदार,इरणा स्वामी,यांच्या सह विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts