Blog

श्री रामनवमी निमित्त “प्रभु श्रीराम” चरित्राचा अमृतमय गोड़वा—

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद।

======================================================================================================

आज प्रभू श्रीराम नवमी आहे श्री प्रभु राम नवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

प्रभु श्री रामचंद्राचे नाव माहित नाही असा जगात एक ही व्यक्ति नाही की एक ही जीव सापडणार नाही.हजारो वर्षापुर्विचा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा म्हणजे रामायण ग्रन्थ हजारो वर्षानंतरही महाकाव्य रामायणातील चरित्राची, घटनेची ,प्रसंगाची गोडी आजही अमृता सारखी आहे !महाकवी आद्यकवी महर्षी वाल्मिकींनी लिहिलेला अमूल्य रामायण ग्रंथ ज्यामध्ये शंभर कोटी अमृतमय श्लोक आहेत तेव्हा हे शंभर कोटी श्लोक असलेले गोड रामायण सर्व देवांनाच पाहिजे होते व देव-देवता मध्ये रामायण ग्रंथ मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली होती, देव, दानव आणि मानव हे सगळेच रामायण मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले असा उल्लेख आढळतो किती आश्चर्य!!

आणि त्या रामायणातील सर्वात सर्वश्रेठ,आदर्श,उत्कृष्ट कार्य करणारा,राजा,रामराज्य कसे असावे हे जगाला आदर्श सांगणारे राजा म्हणजे प्रभु श्री राम होत! तेजस्वी,सत्यवादी, धैर्यशील,न्यायप्रिय,नीतिप्रियदीन दुबळ्यांचे कैवारी,लोककल्याणकारी,प्रजाहितदक्ष,मंगलकारी,चरित्रवान,एक पत्नी,एक वचनी,एक बाणी,प्रजेवरअपार प्रेम करणारा,प्रजेचे दुख जानणारा असा राजा म्हणजे प्रभु श्रीरामचन्द्र होय! प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार पण पृथ्वीवर मानव रूपाने जन्म घेऊन मानवांना एक आदर्श संदेश देण्यासाठी त्यांना जन्म घ्यावा लागला तो दिवस म्हणजेच श्री राम नवमी चा दिवस होय प्रभू श्रीरामाच्या पृथ्वीवर अवतरणा चा दिवस! या प्रसंगाने संपूर्ण धरती आनंदाने, उत्साहाने नाहुन निघाली!पक्षी किलबिल ,किलबिल करू लागले,मोर नाचु लागले,कोकिळ गाउ लागली हवा उच्चाद मांडू लागली तळपता सूर्य आत्मतेजाने शांतमय सोनेरी किरणे उधळू लागला अयोध्या नगरी मंगलमय प्रसन्न तेने सनई, नगारे वाजु लागले ।
या जगात तसे खूप देश आहेत पण त्या सर्वात भाग्यशाली आपला भारत देश आहे

उत्तर भारतात आयोध्या नावाची पुण्यनगरी आहे त्याच पवित्र व पुण्यनगरीत प्रसिद्ध राजा दयाळू, मायाळू ,नीती ,न्याय, प्रामाणिक ,राजा दशरथ यांचे राज्य होते राजा दशरथ व कौसल्या माता यांच्या पोटी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला प्रत्यक्ष देवांचा अवतार श्री महाविष्णूचा अवतार म्हणजेच प्रभू श्री रामचंद्र होय त्यांचा जन्मोत्सव अखंड भारतात श्री राम नवमी या नावाने साजरा केला जातो नवमीच्या दिवशी दुपारी ठीक बारा वाजता श्रीरामांचा जन्म झाला म्हणून संपूर्ण भारतात राम नवमी हा उत्सव मोठ्या आनंदात उल्हासात साजरा केला जातो आयोध्या नगरीत तोरणे ,पताके बांधून सडा-रांगोळी स्वच्छता साफसफाई ,रंगरंगोटी करुंन आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो पशु-पक्षी प्राण्यावर अतोनात प्रेम करणारा ,नद्या, पर्वत ,वृक्षवल्ली, सजीव व निर्जीव ज्यांच्यावर प्रेम करतात असे प्रभू श्रीराम ज्यांच्या फक्त नामस्मरणाने रामनामाने हिमालयासारखे संकट क्षणात नष्ट होते! ज्यांच्या नामाने मोठमोठे दगड पाण्यावर तरंगतात !ज्यांच्या फक्त नामाने दुष्टांचा थरकाप उडतो ते प्रभू श्रीराम महान तपस्वी महान कविवर्य महर्षी वाल्मिकी यांनी आपली भविष्यवाणी अभ्यासुन ज्यात आपला जीव ओतून रामायणा सारखा जगात विश्वात प्रख्यात महान सौंदर्यवान, मूल्यवान ,शक्तिवान ,सामर्थ्यवान जगातील सर्व संस्कार मूल्य, शक्ती मूल्य, नीतिधैर्य मूल्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, जीवशास्त्र, सर्व जगातील विज्ञान शास्त्रांचा अभ्यास ज्यात आहे ते मूल्यवान रत्न म्हणजे रामायण ग्रंथ

वाल्मिकी महर्षी ने लिहिला आश्चर्य म्हणजे पूर्व इतिहास प्रथम लिहिला आणि त्या इतिहासावर भविष्यकाळ घडला !किती आश्चर्य प्रभू श्रीरामाच्या जन्माच्या अगोदरच ज्यांनी रामायण लिहिले त्यांची शक्ती किती महान! महान !श्री संत तुलसीदासांनी ही आपल्या रामचरितमानस या ग्रंथात प्रभू श्रीराम रा यांचे वर्णन केलेले आढळते. हजारो वर्षानंतरही रामायण या ग्रंथाची गोडी आजही अवीट वाटते त्यातील एक प्रसंग हा आजही आपल्या मनावर बिंबवला जातो एक एक प्रसंग सजीव वाटतो संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीचे मूल्य वैशिष्ट्ये संस्कार मूल्य देणारा हा अमूल्य ठेवा ग्रंथ म्हणजे महाकाव्य रामायण होय प्रभू श्रीरामांच्या चरित्रातील, व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे खूप महत्त्वाचे स्थान आहे राम चरित्रातील मातृप्रेम, पितृ, प्रेम, बंधुप्रेम ,समाज प्रेम ,पत्नी प्रेम, प्रजा प्रेम, तसेच पशुपक्षी प्राणी, झाडी वेली फुले, फुलपाखरे, पृथ्वी वसुंधरेवर श्रीरामांचे खुप प्रेम दिसून येते हिरवाईने नटलेल्या वसुंधरेला प्रणाम करून माता जननी ला वंदन करतात भरत भेटीचा प्रसंग बंधू प्रेमाचा तो प्रसंग अंगावर रोमांच आणनारा ,जगाला बंधुप्रेमाची जाण प्रेरणा देतात. लक्ष्मण तर श्रीराम आणि सीतेची सावली बनून राहतात, जीवनभर सेवा करतात, प्रभू श्रीरामाच्या चरणी सदैव सदैव सेवेत राहतात.

प्रसंगानुसार परिस्थितीनुसार प्रभू श्रीरामाला चौदा वर्षाचा वनवास होतो तो प्रसंग आठवा भरत आपल्या वडील बंधू प्रभू श्रीरामाच्या चरण पादुका सिंहासनावर ठेवून 14 वर्ष राज्य करतात हे बंधुप्रेम हजार वर्षापूर्वीचे प्रसंग आजही आपल्याला डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाहीत आज श्री राम नवमी निमित्त मी खारिचा वाटा म्हणून प्रभू श्री रामाबद्दल लिहिण्याचे धाडस करीत आहे ते आपल्या सर्व वाचकांच्या आशीर्वादाने,प्रेरनेणे। आपल्या जीवनात कितीही मोठी संकटे आली तर त्या संकटांना कसे तोंड द्यायचे? संयम कसा ठेवायचा हे प्रभु श्रीरामांच्या चरित्रातून पाहायला मिळते प्रभू श्रीरामाच्या चरित्राचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात, विचार थिटे पडतात, प्रभू श्रीरामांचे पत्नी प्रेम सीता माते वरील प्रभू श्रीरामचंद्रांचे प्रेम संपूर्ण विश्वाने, जगाने, देवी देवता ने पाहिलेले आहे रावणा द्वारे सीता हरणाचा प्रसंग पाहून ऐकून आपण निस्तब्ध होतो

माता सीतेचे हरण झाल्यानंतर प्रभु श्रीराम व लक्ष्मणाची मनाची अवस्था आपण पाहिलेली आहे, जंगला जंगला मध्ये, वना वना मध्ये प्रभू श्रीराम सिते- सिते— म्हणून मोठ-मोठ्याने धाय मोकलून रडत होते वाटेत येणाऱ्या पशुपक्षी प्राणी यांच्या गळ्यात पडून मिठी मारून रडत होते! व त्यांना प्रश्न विचारत होते की माझी सीता पाहिलित का? माझी प्रिय प्रिय अतिप्रिय सीता कुठे आहे? दगडाला विचारत होते ,झाडांना कवटाळत होते, वेली फुले पाखरांना केविलवाणे होऊन विचारत होते की, माझी सीता कुठे आहे? हे प्रभु श्रीरामांचेआपल्या पत्नी वरील प्रेम संपूर्ण विश्वाने पाहिलेले आहे! एक वचनी, राजा ने दिलेला न्याय, घेतलेला निर्णय, जनतेला दिलेला न्याय हा खराच व सत्यच असला पाहिजे. कोणावरही अन्याय होता कामा नये याची खरी खबरदारी घेण्याचे काम राजाचे असते राजा हा जनतेचा माय बाप असतो ,सुख-दुःख जाणणारा असतो ,तोच खरा राजा होय एक न्याय, सत्यवादी, धर्म नीती जाणणारा ,ज्यांनी जगाला आदर्श दिला. हजारो वर्षांचे संस्कार आजही जिवंत आहेत सारे जग आपल्या या महाकाव्या कडे आदराने, कौतुकाने, आश्चर्याने पाहत आहे व त्याचा अभ्यास करीत आहे

आपल्या सावत्र आईने आपल्या पित्याला दिलेल्या वचनाचे पालन करणारे प्रभू श्रीराम केवळ आणि केवळ आपल्या वडिलांनी दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला वनवास केला आणि वनवासी बनून राहिले व जंगलात वेगवेगळ्या वनांमध्ये आपले जीवनमान काढू लागले फक्त कंदमुळे, फळे, वनस्पती त्यांचा आहार होता ऋषीमुनींची सेवा करणे त्यांची सुरक्षितता ठेवणे दुष्ट राक्षसांपासून त्यांचे संरक्षण करणे हेच महत्त्वाचे कार्य त्यांनी वनवासाच्या कालावधीत केलेले आढळते. आजच्या आधुनिक काळातील समाज कार्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांनी सर्वांनी रामायणातीलएक,एक आदर्श घेऊन अमलात आणला तर आजही रामराज्य येण्यासअड़चन नाही. सर्वत्र आनंदी आनंद होण्यास आपला देश सुजलाम सुफलाम होण्यास भरपूर मदत होईल व देश सुखी समृद्ध सर्व बाबतीत विकसित होईल.व आपण रामनवमी साजरी केल्याचे सार्थक होईल।

बोलो जय सियाराम।🙏🏻🙏🏻

Related posts